अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये चांगलीच गुंतवणूक झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सेन्सेक्स विक्रमी पातळीवर जाऊन पोहचला होता.
या दरम्यान अनेक शेअरने गुंतवणूकदारना चांगलाच नफा मिळवून दिला होता. दरम्यान शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये देखील काहीशी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
शुक्रवारी व्यापार संपल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 434.93 अंक म्हणजेच 0.85 टक्क्यांनी घसरून 50,889.76 वर बंद झाला.
त्याच वेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निफ्टी 137.20 अंकांनी म्हणजेच 0.91 टक्क्यांनी घसरून 14,981.75 वर बंद झाला. आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मोठी उसळी नोंदवली होती.
परंतू त्यानंतर बाहेरील गुंतवणूकदारांसह देशातील गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा पर्याय स्वीकारला होता. आणि त्यामुळे आठवड्याच्या दुसऱ्या सत्रापासून भांडवली बाजाराने घसरण नोंदवण्यास सुरवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
‘या’ शेअर मध्ये झाली घसरण आज शेअर बाजारातील सेन्सेक्स मधील ओएनजीसीच्या समभागांमध्ये सर्वाधिक 5.06 टक्क्यांची घसरण झाली. एसबीआय, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो,
मारुती, पॉवरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट, भारती एअरटेल, आयटीसी, सन फार्मा, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा,
एचडीएफसी बँक, टायटन, एचडीएफसी , कोटक महिंद्रा बँक आणि इन्फोसिसचे समभाग देखील घसरणीसह बंद झाले. ‘या’ शेअरमध्ये तेजी इंडसइंड बँकेच्या समभागात सर्वाधिक 1.97 टक्क्यांची वाढ झाली.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, डॉ. रेड्डीज, एनटीपीसी, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एचसीएल टेक आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स वधारले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved