बेशिस्तांवर कारवाईसाठी एसपी व जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यात लग्न सोहळ्यासाठी केवळ 50 वर्‍हाडींनाच परवानगी आहे.

मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याने आज सोमवारी कलेक्टर राजेंद्र भोसले हे एसपी मनोज पाटील यांना सोबत घेऊन तपासणीसाठी रस्त्यावर उतरले.

या पथकाने सिटी, ताज आणि आशिर्वाद लॉन्स या ठिकाणी रेड टाकली. लग्नप्रसंगी मास्क न वापरणार्‍यांवरही कारवाई करण्यात आली. मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधातही कारवाई सुरू होती.

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्मान झाले आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन देखील अलर्ट झाले आहे.

मात्र नागरिकांची बेफिकीरी कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. या गोष्टींना रोख बसावा व नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी खुद्द जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे खुद्द रस्त्यावर उतरले होते.

कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने कलेक्टर आणि एसपी यांच्या दोघांच्या संयुक्त पथकाने आशिर्वाद, ताज आणि सिटी लॉनमध्ये झाडाझडती घेतली. पन्नासपेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसून आल्याने कारवाई केली.

शहरातील विविध लॉन्स आणि मंगल कार्यालयांची चेकिंग पथकाकडून सुरू आहे. त्यानंतर कलेक्टर-एसपींच्या पथकाने नगर कॉलेजकडे धाव घेत तेथे कोरोना नियमांचे पालन होते की नाही,

याची शहानिशा केली. नियम मोडणार्‍या विद्यार्थी, शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दोघांच्या पथकाने शहरातील विविध भागांत पाहणी करून कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News