अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- निघोज, देविभोयरे, वडनेर व पठारवाडी ग्रामस्थांनी तीन तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर त्यांना यश आले असून सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत निघोज वीज कार्यालयाचे उपअभियंता शेळके यांना घेराव घालण्यात आला.
त्यानंतर ग्रामस्थांनी निघोज-पारनेर रास्तारोको आंदोलन सुरू केले. हे आंदोलन दीड वाजेपर्यंत सुरु होते. आंदोलनकर्त्यांनी शेळके यांना वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगितले.
आंदोलनकर्त्यांचा आक्रमकता पाहून शेळके यांनी वरिष्ठांना परिस्थितीची माहिती दिली. 1 वाजता नगर येथील मुख्य कार्यकारी अभियंता ठाकूर हे या ठिकाणी आले. आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली.
त्यानंतर चारही गावांतील शेतकर्यांनी विद्युत मोटारचे प्रत्येक कनेक्शन पाठीमागे 5 हजार रुपये तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
दि. 5 मार्चपर्यंत शेतीपंपाचा वीजपुरवठा नियमीतपणे सुरू ठेवण्याचा निर्णय अधिकारी व आंदोलक शेतकरी ग्रामस्थ यांच्या चर्चेतून घेण्यात आला.
यावेळी निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक निकम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|