अहमदनगर जिल्ह्यात खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र मिळावे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-  खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून अहमदनगर जिल्ह्याला डावलण्यात आले असून, जिल्ह्यात खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप, निखिल कुर्‍हाडे, प्रसाद सामलेटी, पोपट लोंढे, अमोल काजळे आदी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात खेळाडूंना प्रशिक्षण केंद्र जाहीर करण्यात आले असून, महाराष्ट्रात 23 जिल्ह्यांना विविध 15 खेळाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून वर्तमानपत्राद्वारे घोषित करण्यात आले आहे.

परंतु अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असून, जिल्ह्यात खेळाच्या सरावासाठी चांगले स्टेडियम, ज्युदो, तिरंदाजी, नेमबाजी, कबड्डी, खो-खो जलतरण आदी विविध खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच छत्रपती पुरस्कार प्राप्त अनेक राष्ट्रीय खेळाडू आहेत.

तरीसुद्धा खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून अहमदनगर जिल्ह्याचा समावेश झाला नसून, एकप्रकारे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रावर अन्याय झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक, क्रीडा प्रेमी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लवकरात लवकर खेलो इंडियाचे प्रशिक्षण केंद्र घोषित करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व मनपा विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News