मुंबई :- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे दाखवा, हजार रुपये मिळवा, अशी घोषणा केल्यानंतर ती हवेतच विरली होती. आता मात्र मुंबई महापालिकेने देखील ‘खड्डे दाखवा, पैसे मिळवा’ ही योजना सुरू केली आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात शहरातील रस्त्यांवर फक्त ४१४ खड्डे असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षांनी हा दावा खोटा ठरवला. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी महापालिकेच्या एमसीजीएम २४७७ अॅपवर हजारो तक्रारी आल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेऊन अनेक खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र मुंबईतील अनेक रस्त्यांवर अजूनही खड्डे कायम असल्याची स्थिती आहे. दरम्यान, खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा,
ही नवीन योजना आणली आहे. १ नोव्हेंबरपासून या योजनेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे मुंबईत खड्डा दाखवणाऱ्या मुंबईकरांना पालिका प्रशासनाकडून ५०० रुपये मिळणार आहेत.
- प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट
- कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर
- २ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..