महापौर म्हणाले…कामे न करणार्‍या ठेकेदारांना नोटीसा द्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-कमी रकमेची निविदा भरून कामे न करणार्‍या ठेकेदारांना नोटीसा बजाविण्यात याव्यात तसेच ते ऐकत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका, तसेच यापुढील कामामध्ये निविदेमध्ये पूर्वीचे काम पूर्णत्वाचा दाखला आवश्यक असल्याबाबत अट टाकण्यात यावी, असे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले.

दरम्यान शहराचे महापौर वाकळे यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागातील कामांचा आढावा घेतला. यावेळी अनेक विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी अनेक महत्वपूर्ण बाबींवर चर्चा केली. कोवीडच्या प्रादुर्भावामुळे अंदाजपत्रक मंजूरीला उशिर झाला. मार्च 2021 अखेर विकास कामांचे प्रस्ताव मंजूर होवून विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टिने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

परंतू बर्‍याच कामांच्या निविदा कमी दराने भरले जातात. अशी कामे संबंधीत ठेकेदार लवकर सुरू करित नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते.

यामुळे कमी दराने निविदा भरणार्‍या ठेकेदारांना काम सुरू करण्यासाठी नोटीसा देण्याचे आदेश दिले. नोटीस देवूनही काम सुरू न केल्यास काळया यादीमध्ये टाकण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महापौर वाकळे यांनी दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News