नवी दिल्ली : देशात मागील ६ वर्षांपासून रोजगारात सर्वात मोठी घट नोंदवली आहे. एका नव्या अध्ययनानुसार, मागील ६ वर्षांत रोजगारात जवळपास ९० लाखांनी घट आलेली असल्याचे म्हटलेले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रोजगाराच्या घसरणीला सामोरे जावे लागत आहे.
२०११-१२ ते २०१७-१८ च्या दरम्यान भारतात रोजगाराच्या संधीमध्ये घट आली आहे. हा अहवाल संतोष मेहरोत्रा आणि जे.के. परिदा यांनी तयार केलेला आहे. मेहरोत्रा आणि परिदा यांच्या मते, २०११-१२ ते २०१७-१८ च्या वर्षात एकूण रोजगारात जवळपास ९० लाखांनी घट झालेली आहे.

भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलेले आहे. ऑटोमोबाईल्स, सिमेंट, लोखंड उद्योगांवर संक्रात आल्यापासून देशातील एकूणच उत्पादनात कमालीची घसरण पहायला मिळत आहे. बाजारात मागणीच नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी उत्पादन थांबवले असून काही कंपन्यांनी अतिरिक्त साठा करण्यासही नकार दिला आहे. दुसरीकडे रोजगार क्षेत्रातही मंदी निर्माण झाल्याने देशासमोर येत्या बेरोजगारांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण होणार आहे.
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांना 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्टी जाहीर, दिवाळीच्या आधीच सरकारची मोठी घोषणा
- पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दर महिन्याला 4700 रुपयांची गुंतवणूक केल्यास 5 वर्षांनी किती पैसे मिळणार?
- एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! लालपरीचा प्रवास ‘इतक्या’ रुपयांनी महागला
- महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! आता….
- सर्वसामान्य लोकांना आता सरकार देणार 3 लाख रुपयांचे कर्ज ! ‘या’ वेबसाईटवर आजच सादर करा अर्ज