कोल्हापूर : महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बाराईमाम, मंगळवार पेठ येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. जिया झाकीर पटेल (वय १८) असे तिचे नाव आहे. बारावी वाणिज्य शाखेत जिया शिकत होती.
वडील मोलमजुरीचे काम करतात, तर आई घरकाम करते. दिवाळी सुटी असल्याने जिया घरीच होती. वडील शुक्रवारी सकाळी कामावर गेले. आई आणि ती दोघीच घरी होत्या. लहान भाऊ बाहेर खेळायला गेला होता. दुपारी आई कामात होती. यावेळी जियाने दुसऱ्या मजल्यावरील तुळीस गळफास घेतला.
मोठा आवाज झाल्याने आईने वर जाऊन पाहिले तेव्हा जियाने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. दोरी तोडून बेशुद्ध पडलेल्या जियाला सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीने आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाइकांनी केलेला आक्रोश ऱ्हदय पिळवटून टाकणारा होता.
- चालून आली आयपीओत गुंतवणूक करून लाखो रुपये कमवण्याची संधी! गुंतवणूकदारांना लागेल लॉटरी
- महानगरपालिकेत सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नोंद करणे बंधनकारक! आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन
- Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- वार्षिक पगार 15 लाख असलेल्यांसाठी जुना टॅक्स स्लॅब चांगला आहे की नवीन टॅक्स लॅब? जाणून घ्या दोघांचे फायदे
- पीएफ खात्यातून पैसे काढले तरी मिळेल का पेन्शन? जाणून घ्या फायद्याचे नियम