बोठेला पकडणाऱ्या पोलिसांचा ‘एसपी’ च्या हस्ते सन्मान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी पकडले आहे. फरार बोठेला अटक करणार्‍या 6 पथकातील अधिकारी,कर्मचार्‍यांचा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सन्मान केला. आरोपी बाळ बोठे याला पकडण्यासाठी हैद्राबाद येथे 6 पथके पाठविण्यात आली होती.

या 6 पथकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,

आर्थिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस निरीक्षकज्योती गडकरी, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे,

तोफखान्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, नगर ग्रामीण उपअधीक्षक कार्यालयातील पो.हे.कॉ.रविंद्र पांडे, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, राहुल गुंडू, अभिजीत अरकल, जयश्री फुंदे,

संतोष लोढे, गणेश धुमाळ, भुजंग बडे, सचिन वीर, सत्यम शिंदे, चौगुले, मिसाळ, सानप, रणजीत जाधव, बुगे, जाधव, दातीर, प्रकाश वाघ, राहुल डोळसे व रितेश वेताळ आदींचा समावेश होता.

या पथकांच्या या कामगिरीमुळे नगर पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या 6 पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe