दुबई : पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी ट्वेण्टी २० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २००७ साली पहिले विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ ब गटात असून इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इतर दोन पात्र संघ असतील.
अ गटात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि दोन पात्र संघ असतील. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाशी होईल, तर यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील सामन्याने विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ फेरीला सुरुवात होईल.

ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० दरम्यान होईल. उपांत्य फेरीचे सामने ११ आणि १२ नोव्हेंबरला तर अंतिम सामना १५ नोव्हेंबरला मेलबर्न स्टेडियमवर खेळला जाईल.
पहिल्या फेरीत अ गटातील श्रीलंकेसह तीन पात्र संघ, तर ब गटात बांगलादेश आणि तीन पात्र संघ असतील. या फेरीचे सामने १८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान होईल.
भारतीय संघाने २००७ साली, तर पाकिस्तानने २००९ साली ट्वेण्टी २० विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. आयसीसी ट्वेण्टी २० विश्वक्रमवारीत पाकिस्तान संघ सर्वोच्च तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
- टाटा SUVचा जलवा कायम; जानेवारी 2026 मध्ये 70,222 गाड्यांची विक्री, नेक्सॉन-पंच आघाडीवर
- शेअर मार्केट पुन्हा लाल निशाणीत ! चार दिवसांच्या तेजीला ब्रेक; ‘या’ सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी विक्री
- लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; जानेवारी – फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का? महिलांमध्ये संभ्रम
- ३० गुंठ्यात आल्याची शेती; १४ महिन्यांत साडेचार लाखांचा निव्वळ नफा, कोपरगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा
- भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 6 पेट्रोल आणि हायब्रिड कार्स; वाढत्या इंधनदरांत ग्राहकांसाठी फायदेशीर पर्याय













