अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- सोन्याचे दर सध्या कमी पातळीवर असल्यामुळे खरेदी वाढल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून सोन्याच्या दरात मापक वाढ होत होती.
आज दिल्ली सराफात सोन्याचा दर 105 रुपयांनी वाढून 44,509 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,073 रुपयांनी उसळुन 67,364 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,738 डॉलरवर आली आहे. आज चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालीय. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 1,073 रुपयांनी वाढून 67,364 रुपये प्रति किलो झाला.
मागील व्यापार सत्रात चांदीची किंमत 66,291 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 26.36 डॉलर प्रति औंस राहिला होता.
2021 या वर्षात महागाई वाढण्याचा धोका असला तरी सर्व बाबींचा विचार करून व्याजदर कमी पातळीवर ठेवले जातील, असे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने म्हटल्यानंतर जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली.
फेडरल रिझर्व्हच्या आश्वासनानंतर जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होऊन सोन्याचे दर वाढले. त्याचा परिणाम भारतातील स्पॉट मार्केटवरही झाला.
मात्र वायदे बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले असल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,738 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.36 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहेत.
गेल्या वर्षी लॉक डाऊनमुळे सोन्याच्या दरात बरीच वाढ झाली होती. मात्र या वर्षी जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे सोन्याचे दर तुलनेने कमी पातळीवर आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|