कापड बाजार, मोची गल्लीतील रस्त्यावरील अतिक्रमणे काढा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-कापड बाजारातील अनाधिकृत अतिक्रमणे काढावीत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाज कंटकांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त यांना संयुक्तरित्या दिले.

कापड बाजारातील घासगल्ली, शहाजी रोड, नवीपेठ, महात्मा गांधी रोड, मोची गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच पथविक्रेत्यांनी बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे अतिक्रमणे केलेली आहेत. या अतिक्रमाणामुळे रस्त्यावरुन पायी चालणेही मुश्किल झाले आहे.

सदरील अतिक्रमण असलेल्या परिसरात गर्दीच्या दिवशी महिलांची छेडाछाड होते. अश्लिल शेरेबाजी करण्यात येते, त्यामुळे कायमच इथे वादविवाद होत असतात. प्रसंगी बाजारात दरवेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

या संदर्भात आतापर्यंत विविध राजकीय पक्षांनी, संघटनांनीही आणि बाजरातील व्यापार्यांनी वेळोवेळी पोलिस प्रशासन आणि महानगरपालिकेने कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदने दिलेली आहेत.

दरम्यान गुंडप्रवृतीच्या इसमांकडून या ठिकाणी अनेकदा धुडगूस घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे पोलिस खात्याने बाजारपेठेतील हा प्रकार गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केल्यास शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News