अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा देणारी बातमी आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान, तर इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.
10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी कोरोनामुळे आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहात असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही.
अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
आताच्या परीक्षेला विद्यार्थी आले नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल, असे गायकवाड यांनी सांगितले आहे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|