उत्तर प्रदेशातील १४ वर्षांची अल्पवयीन विद्यार्थिनी,मोबाईलमध्ये तरुण मुली, महिला यांचे फोटो…शिर्डीतील त्या वेश्या व्यवसायामुळे आंबट शौकिनांमध्येही खळबळ

Published on -

शिर्डी | निमगाव हद्दीतील हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सहाजणांसह तीन महिलांवर गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री हॉटेल साईधनवर कारवाई करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक गोकूळ औताडे, सहायक निरीक्षक दीपक गंधाले, सहायक मिथुन घुगे यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यावर दोन महिला व दोन ग्राहकांना पकडले.

निघोज शिवारात हॉटेल साईधन मध्ये अवैधरित्या मुली बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जातो, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन बनावट गिऱ्हाईक सोहन मकरंद गुणे, वय ३० रा. आश्वी याला पाठवून ठरल्याप्रमाणे ग्राहक हॉटेलात गेला असता  त्याच्याकडून २५०० रोख रकम घेवून हॉटेलच्या वरच्या खोलीत एक मुलगी आहे तेथे पाठविले.

तेवढ्या वेळात ग्राहकाने पोलिसांना मिसकॉल केला आणि डिवायएसपी वाघचोरेंसह पोलीस पथकाने हॉटेल साईधन येथे छापा टाकला. तेव्हा या ठिकाणी एका रुममध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी १४ वर्षांची अल्पवयीन विद्यार्थिनी आढळून आली. तिची महिला पोलिसांनी झडती घेतली असता तिच्याकडे एक मोबाईल हॅण्डसेट मिळून आला. ती विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले.

दुसऱ्या खोलीत अर्चना नावाची ३४ वर्षाची तरुण महिला सातारा जिल्ह्यातील मिळून आली. तिच्याबरोबरील पुरुष ग्राहक गोपीनाथ रावसाहेब हिंगे, रा. पिंपळवाडी याला पकडले.दुसऱ्या खोलीत अक्षय बगळे, लक्ष्मीनगर यालाही पकडले.

अर्चनाकडे चौकशी केली असता तिचे पंचासमक्ष गणेश काकडे, सागर जाधव, सुनील दुशिंग यांनी मला आज या ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेले असून महिला मंगल, किरण व अनुराधा यांनी मला मागील एक महिन्यापासून राहाता येथे त्यांच्या सोबत ठेवलेले असून मागील एक महिन्यापासून मला शिर्डी शहरात व्यवसाय करण्यासाठी घेवून जातात व माझ्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतात, असे सांगितले.

घटनास्थळावरुन चार निरोध पाकीटे, १५०० रुपये रोख, मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आला. हॉटेल मॅनेजरची झडती घेतली असता त्याच्याजवळ बनावट ग्राहकाने दिलेली दोन हजाराची नोट मिळून आली. मॅनेजर विष्णूअर्जुन ठोंबरे यालाही ताब्यात घेतले.

यावेळी लपून बसलेला इसम गणेश सीताराम कानडे, सुनील शिवाजी दशिंग तसेच सागर बाबुराव जाधव असे पोलिसांना पाहुन हॉटेलातून ईर्टिका कार नं. एमएच १७ एझेड १५३ मधून चालक सचिन रामभाऊ शेळके याच्यासह पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस कर्मचार्यांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांच्या जवळून मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

दरम्यान रात्री हा छाप्याचा प्रकार घडल्यानंतर शिर्डीत अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून हॉटेल मालकालाही आरोपी करण्यात आले आहे. यासंबंधी डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला असता मोबाईलमध्ये तरुण मुली, तरुण महिला यांचे फोटो आरोपींजवळ मिळून आले असून मोबाईल मधील फोटो गिऱ्हाईकाला दाखवून हा वेश्या व्यवसाय शिर्डी शहर परिसरात केला जायचा.

अल्पवयीन मुलगी, वय वर्ष १४ हिला वैद्यकीय तपासणी करण्यात येवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे डिवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले. या घटनेने आंबट शौकिनांमध्येही खळबळ उडाली असून एक जागतिक पातळीवरचे तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत अशाप्रकारे वेश्या व्यवसाय तोही मोठ्या हॉटेलात चालतो हे उघड झाल्याने भाविकांमध्ये कमालीचा राग व्यक्त होत आहे.

या सर्व आरोपी विरोधात स्रियांचा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 भादंवि कलम 366 अ बाल न्याय अधिनियम 2000 चे कलम 26 अन्वये शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी घरगुती, लॉजिंग वर सुद्धा यांची करडी नजर असून लवकरच त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News