फिरायला जाणाऱ्यांनो सावधान… “तो” पुन्हा आलाय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नगरमधील चांदबिबी महाल परिसरात आज मंगळवारी सकाळी रस्त्यावर नागरिकांना बिबट्या दिसून आला.

बिबट्याचा या भागात वावर असला तरी त्याचा उपद्रव मात्र नाही. पण तरीही या भागात फिरायला जाणार्‍या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे.

काही महिन्यांपूर्वी महालच्या परिसरात दोन बिबटे दिसल्याने या भागात भीतीचे वातावरण होते. मात्र आज मंगळवारी सकाळी मात्र महालच्या रस्त्यावर पुन्हा काही जणांना बिबट्या दिसला.

या भागात फिरायला जाणारे नगर मधील सुनील माळवदे यांच्या गाडीला बिबट्या आडवा पळाला. माळवदे यांनी तात्काळ मंदार साबळे यांना या संदर्भात कळविले.

साबळे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना तशी माहिती दिली. उन्हाळ्यामुळे सध्या गवत वाळलेले असून पानगळही झालेली आहे

त्यात बिबट्याचा रंग परिसराशी खूप मिळता जुळता असल्याने झाडीत लपलेला असला तर तो चटकन नजरेस पडत नाही त्यामुळे आडवटेला कोणी जाऊ नये असे आवाहन साबळे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe