हिवरेबाजारला उमंग फाउंडेशनच्या कार्यालयाचे शुभारंभ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- हिवरेबाजार (ता. नगर) येथे उमंग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे शुभारंभ गावचे सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसन्न पोपटराव पवार, बाळासाहेब ठाणगे, रहनाज सय्यद, बेबीताई चव्हाण, निर्मला बोरकर, पद्माबाई लोणारे, जनाबाई गिर्‍हे, मुमताज सय्यद, मिनीनाथ लोणारे, कुमार लोणारे,

उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे, उपाध्यक्षा संगीता गिर्‍हे, महेंद्र गिर्‍हे, छबुराव गिर्‍हे, पोपट गिर्‍हे, विमल गिर्‍हे, भाऊसाहेब गिर्‍हे आदी उपस्थित होते.

उमंग फाऊंडेशन ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवित असून, फाऊंडेशनच्या कार्यालयाचे व फाऊंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे देखील उद्घाटन पद्मश्री पोपट पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु असून, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचे तसेच त्यांचे विविध प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु आहे.

संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या संजीवनी निसर्गोपचार केंद्राद्वारे विविध व्याधींचे उपचार आयुर्वेदिक पध्दतीने केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पोपट पवार, अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe