अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील शेतकरी वैभव तनपुरे यांच्या विहीरीवरील २० हॉर्सपॉवरची मोटार काही दिवसांपुर्वी चोरीस गेली होती.
याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याबाबत पोलिसांनी तपास केला असता समजले कि, त्यानं खात्रीशीर माहिती समजली कि, हा गुन्हा कांतिलाल दत्तात्रय जत्ती, (वय २० वर्षे, रा. वडगाव तनपुरा ता. कर्जत) याने केला आहे.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोटार चोरीची कबुली दिली. तसेच सदरची मोटार त्याने कर्जत येथील भंगारवाला बाजीराव मारुती वाघमोडे रा. कर्जत यास विकल्याचे सांगितले.
पोलीसांनी कर्जत येथील भंगारवाल्याच्या दुकानात जाऊन तपासणी केली असता चोरलेली मोटार मिळुन आली. चोरीचा माल खरेदी केल्याने भंगार दुकानदार बाजीराव लक्ष्मण वाघमोडे यास अटक करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|