कोवीड सेंटरची संख्या वाढवा; तहसिलदारांना दिले निवेदन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नगर तालुक्यात कोरोनाने कहर सुरू केला असुन दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे .

तालुका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत तालुक्यात कोवीड सेंटरची संख्या वाढवावी अशी मागणी नगर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिले .

बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, माजी उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसिलदार अभिजीत बारवकर यांची भेट घेऊन त्यांना करोना उपयोजनांबाबत चर्चा केली.

याबाबत सभापती घिगे म्हणाले की, नगर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन प्रशासनाच्या उपाययोजना कमकुवत ठरत आहेत. शहरातील जिल्हा रुग्णालय व बुथ हॉस्पीटल करोना रूग्णांनी हाऊसफुल झाले आहेत.

खासगी दवाखान्यातील खर्च तालुक्यातील गोरगरीबांना परवडत नाही. यामुळे प्रशासनाने प्रत्येक गावात रॅपिड टेस्ट शिबीराचे आयोजन करून बुऱ्हाणनगर,

चास, जेऊर, देहरे, वाळकी, रूई, अरणगाव आदि ठिकाणी तालुक्यातील रूग्णांसाठी कोवीड सेंटर सुरू करावेत. तेथे व्हेंटींलेटरची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News