उसाच्या शेतात आढळला बिबट्याचा मृत बछडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात बिबट्यांचा वावर पुन्हा वाढला आहे, तसेच अनेक ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

यातच काल एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नेवासा तालुक्यात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा बुद्रुकचे शेतकरी विक्रम पवार यांच्या उसाच्या शेतात बुधवारी सायंकाळी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला.

त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सदर मृत बिबट बछडा हा 8 ते 10 महिने वयाचा असावा. त्यांचे मानेवर दुसर्‍या प्राण्याच्या पंजाचे ओरखडे व त्यामुळे झालेल्या जखमा आढळून आल्या आहेत.

त्याचेपेक्षा मोठ्या बिबट्याशी त्याचे भांडण झाले असेल किंवा इतर प्राण्याने पंजाने मारले असावे. मृत बिबट बछडा मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील निसर्ग परिचय केंद्रात आणण्यात आले आहे..

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe