प्लॅस्टीक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई; 40 हजारांचा दंड केला वसूल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कोपरगाव शहरात प्लास्टिकच्या वापरावर बंदी असताना शहरात एका ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा मोठा साठा असल्याचे नगरपालिका प्रशासनास कळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ४० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करून व्यापार्‍यावर कारवाई केली.

दरम्यान या कारवाई 40 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, आरोग्य विभागाचे प्रमुख सुनील अरण, मनोज लोट, रणधीर तांबे, चंद्रकांत साठे यांनी ही कारवाई केली.

30 मार्च रोजी व्यापारी धर्मशाळा याठिकाणी ही तपासणी मोहीम पालिकेने राबविली होती. राज्यात प्लास्टीक व थर्माकोल अविघटन शिल वस्तूच्यां वापरावर, उत्पादनावर, विक्री, हाताळणी, साठवणुकीवर बंदी असताना शहरातील अनेक व्यापार्‍यांनी त्याची विक्री केली.

यामुळे शहरातील 5 ते 6 व्यापार्‍यांकडून प्लास्टीक जप्त करून दंडात्मक कारवाई करून चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीची मोहीम वेळोवेळी राबण्याचा प्रयत्न केला परंतु काही नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे ही मोहीम थंडावली होती. परंतु आता यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe