एकदंत गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- दातरंगे मळा, एकदंत कॉलनी येथील एकदंत गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकदंत कॉलनी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवुन परिसर स्वच्छ करुन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. कॉलनीत सर्वत्र भगवे पताके व झेंडे लावण्यात आल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले.

परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच महाराजांच्या जीवन चरित्रावरील पोवाडे लावण्यात आली.

त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी ओंकार बुरगुल, गणेश नागुल, विनित इराबत्तीन, ऋषिकेश इराबत्तीन, ऋषिकेश सामल, रितेश मेरगु, संतोष चेन्नुर, प्रथमेश चाटला, यश मंचे, आकाश सिरसुल, श्रीनिवास इराबत्तीन,रोशन सुंकी,

साई बेत्ती, समर्थ बोडखे, निखिल सग्गम, स्वप्निल सग्गम, गौरव म्याना, गणेश नागुल, राजेश नागुल, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|