अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज येणारे नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचे आकडे धडकी भरवणार आहेत.
राज्यातील काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत तर काही जिल्हयांमध्ये अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अशाच प्रकारे वाढत राहिल्यास आणि जनतेने कोरोनाचे नियम नाही पाळल्यास राज्यात आणखी कडक निर्बंध किंवा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.
आपल्याला जनतेचं जीव वाचवायचं आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघेन. सर्व अधिकाऱ्यांकडून आढावा घेईन. राज्यात बदल दिसला नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्याबाबतचा इशारा देतो.
त्यामुळे आतापासून आपण ठरवूया. आपण ही लाट रोखूच. याशिवा यापुढची लाटही रोखूया”, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. “मधल्या काळात कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही.
आपणच त्याच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे”,
असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळा. अशीच रूग्ण वाढ होत राहीली तर हॉस्पीटल तुडुंब भरून जातील. संसर्गाची लाट आपण रोखू शकतो.
फक्त ती जिद्द आपल्यामध्ये असायला हवी. प्रत्येकांनी ठरवायला हवे की आपण कोरोनाला रोख शकतो.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध हे घालावेच लागणार, त्याबाबतची नियमावली उद्या-परवा जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण त्यांनी संपुर्ण लॉकडाऊन करण्याचा इशारा देखील दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|