नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी स्वखर्चातून टाकली पिण्याची पाईपलाईन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-प्रभाग 8 मधील गांधीनगर या भागातील फारूख पठाण घर ते नवनाथ जगधने घरांपर्यंत पिण्याची पाईपलाईन निष्कृष्ट दर्जाची झाल्याने यातुन दुषित पाणीपुरवठा होत होता.

ही पाईपलाईन नवीन टाकण्यासाठी महिलांनी प्रभाग 7 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्याकडे मागणी केली असता संबंधित पाईपलाईनची पाहणी करून वाकळे यांनी पुर्वीची निकृष्ट झालेली पाईपलाईन काढुन नवीन स्वखर्चातुन टाकली.

परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. व याच पाईपलाईनने दुषित पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी वाकळे यांच्याकडे मागणी केल्यानंतर वाकळे यांनी स्वखर्चाने जेसीबी व एक स्विस वॉल दिला.

तर नागरिकांनी लोकवर्गनीतुन पीव्हिसी पाईप टाकले. या कामामुळे परिसरातील महिलांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

तसेच या कामाचे सविता महाडूंळे, माया क्षेत्रे, मनिषा जगधने, इंद्रायणी रोहोकले, सविता चिंचकर, आदिका उल्हारे यांनी नगरसेवक वाकळे यांचे आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe