अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जगातील सर्वात लोकप्रिय आयपीएल टी-२० लीगच्या १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. सलामीचा सामना पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे.
मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा तर बेंगळुरूचे नेतृत्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली करत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली होती. स्टेडीअममध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.
या वर्षी आयपीएल स्पर्धा देशातील सहा शहरात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील २० लढती चेन्नई आणि मुंबईत होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद आणि दिल्लीत १६ लढती होतील. तर अखेरच्या २० लढती बेंगळुरू आणि कोलकाता येथे आयोजित केल्या जातील.
प्लेऑफ आणि अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. मुंबई इंडियन्सने २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावले होते. आता त्यांचा प्रयत्न हॅटट्रिक करण्याचा असेल. अशी कामगिरी केली तर ते सलग तीन विजेतेपद मिळवणारे पहिले ठरतील.
याआधी चेन्नई सुपर किंग्जने २०१० आणि २०११ मध्ये सलग दोन वेळा विजेतेपद मिळवले होते. पण त्यांना हॅटट्रिक करता आली नव्हती. २०१२ च्या फायनलमध्ये त्यांचा कोलकाताने पराभव केला होता.
२०१३ पासून आठ वर्ष मुंबई इंडियन्स आयपीएलमधील त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभूत होत आहेत. खराब सुरुवातीनंतर देखील ते नंतर चागंली कामगिरी करतात. या वर्षी पहिली लढत बेंगळुरू विरुद्ध होणार आहे.
आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आठ वर्षातील खराब सुरुवातीचा विक्रम मोडणार का हे पाहावे लागेल. दरम्यान, भारतात या वर्ष अखेरीस टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी आयपीएल स्पर्धा एक प्रकारची टेस्टच असेल.
बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन यशस्वीपणे केले तर आयसीसीला कोरोना स्थितीत देखील वर्ल्डकप सुरक्षितपणे होऊ आयोजित केला जाऊ शकतो यावर विश्वास बसेल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|