हतबल झालेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली जनावरे! तब्बल चार लाखांचे नुकसान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- आज कोरोनामुळे सर्वत्र केवळ बंद आणि लॉकडाऊन केले जात आहे. यामुळे मात्र समाजावर व देशासह प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक गणितावर विपरित परिणाम होत आहे.

यात अनेकांनी मोठ्या उमेदिने भाजीपाला व फळपिकांचे उत्पादन घेतले. मात्र कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच बाजारपेठा ठप्प आहेत.

त्यामुळेे आता या मालाचे करायचे काय. असा प्रश्न उपस्थित करत अत्यंत कष्ट उपसत पिकवलेल्या सोन्यासारख्या मालात जनावरे सोडण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राज्य शासनाच्या कडक निर्बंधामुळे आठवडे बाजार बंद आहेत.

परिणामी, अनेक भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल शेतातच सडत आहे. यात सर्वाधिक नुकसान भाजीवर्गीय आणि फळपिकांचे होत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

मागील लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेल्याने आता ती कसर भरून निघेल या आशेवर मोठा खर्च करून भाजीवर्गीय व फळपिके घेतली. मात्र शेवटी हाती निराशाच आली. पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याने दोन एकरात खरबुजाचे उत्पादन घेतले.

आता उन्हाळ्यात बाजारपेठेत खरबुजाची मागणी वाढेल, अशी आशा त्यांना होती. पण, आठवडे बाजारबंद झाल्याने खरबुजाचे भाव गडगडले.

त्यामुळे शहरात ते विक्रीसाठी नेले तरी वाहतूक खर्चही निघणे अवघड असल्याने त्यांच्या शेतातील काढणीस आलेले खरबूज जागेवरच वाळत असून, त्यात त्यांनी जनावरे सोडले. यामुळे त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिवाय कष्ट वाया गेले ते वेगळेच.  हे नुकसान केवळ प्रातिनिधिक आहे. अशीच स्थिती जिल्ह्यासह राज्यतील अनेक शेतकऱ्यांची आहे.

डांगर भोपळा, टरबूज, टोमॅटो आणि इतर फळपीक, भाजीवर्गीय पिकांचे उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. गतवर्षीही नुकसान, त्यानंतर झालेली अतिवृष्टी यातून कसेबसे सावरलेल्या शेतकऱ्यांवर आता मोठे आर्थिक संकट आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe