अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- व्हाट्स अॅप वर आता अनावश्यक मेसेज पासून लवकरच सुटका होणार आहे. कारण व्हाट्सअॅप ने असे काही फिचर लॉन्च केले आहे. की अॅपवर आता 24 तासांत मेसेज आपोआप डिलीट होणार आहेत.
नवीन फिचर अॅण्ड्रॉईड, आयओएस तसेच वेब वरही काम करणार आहे. व्हॉट्स अॅपवर नवनवीन मेसेजेस, तसेच विविध ग्रुप्सवरील मेसेजचा मोठा खच साचतो, मग हे अनावश्यक मेसेज डिलीट करण्यावर आपला बराच वेळ वाया जातो.
नव्या फिचरमुळे व्हॉट्स अॅप युजर्सचा वेळ वाचणार आहे. व्हॉट्स अॅपने यापूर्वी अनावश्यक मेसेज 7 दिवसांत गायब करण्याची सुविधा देण्यात आली होती.
मात्र आता हेच मेसेज 24 तासांनंतर गायब होणार आहे. या नवीन फिचरसह व्हॉट्स अॅप आपल्या प्रतिस्पर्धी अॅप्सना टक्कर देणार आहे. याच दृष्टीकोनातून व्हॉट्स अॅपने युजर्सना नवनवीन पर्याय देऊ केले आहेत.
7 दिवसाचा किंवा 24 तासांचा पर्याय निवडू शकता. व्हॉट्सअॅप आधीपासून सुरू असलेल्या 7 दिवसात आपोआप मॅसेज गायब होणारा पर्याय बंद करणार नाही, तर यातच युजर्सला नवीन पर्याय उपलब्ध करुन देईल.
आपण 7 दिवसाचा किंवा 24 तासांचा पर्याय निवडू शकता. म्हणजे वापरकर्त्यांकडे दोन्ही पर्याय असतील. ज्यामध्ये 24 तासात मॅसेज गायब करण्याचे इनेबल आणि डिसेबल असे दोन पर्याय असतील.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|