अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- नगर शहरातील लक्ष्मीबाई कारंजा परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या दानपेटीतून पंधरा हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शांतीलाल भगवानदास मुनोत राहणार महाजन गल्ली यांनी या संदर्भामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
मंदिराचे १९८४ पासून मी व अरुण कंकाळ असे ट्रस्टी आहोत. आम्ही हनुमान जयंतीवेळी दर वर्षी मंदीरातील दान पेटी उघडुन दान पेटीत जमा झालेल्या रकमेतून हनुमान जयंती सण उत्सव साजरा करत असतो. चालु वर्षी कोरोणा संसर्ग असल्यामुळे दान पेटी उघडली नव्हती.
मंदीर लॉकडाऊन असल्यापासुन कुलुप लावुन बंद असते त्याची चावी मंदिरा शेजारी पुष्प विक्री करणारे ऋषीकेश अरुन अलचेटटी याचेकडे असते.
ते रोज सकाळी ७ च्या सुमारास मंदिरात पुजा करुन दरवाजा बंद करतात. ४ मे ला सकाळी ७ च्या सुमारास ऋषीकेश अरुन अलचेटटी यांनी मंदीर उघडुन पुजा करुन मंदीर बंद केले होते.
५ मे रोजी सकाळी ६ च्या सुमारास हनुमान मंदीरा शेजारी राहणारे संतोष विठ्ठल जाधव यांनी फोनव्दारे मला कळविले की, हनुमान मंदीराचे कुलुप कुणीतरी तोडल्याचे व दरवाजा उघडा दिसुन येत आहे.
तसेच मी लगेच हनुमान मंदीर लक्ष्मीबाई कारंजा चौक येथे गेलो व मंदीराची पाहणी केली असता दान पेटी दिसून आली नाही. ती चोरी झाल्याचे लक्षात आले आहे, त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देत असल्याचे मुनोत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|