विलगीकरणातील ग्रामस्थांनी उन्हाळ्यात जगवली झाडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोना बाधितांच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह झालेल्या ग्रामस्थांना निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी फळ व गुलाबपुष्प देऊन त्यांना निरोप दिला.

कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या गावातील रुग्णांना चौदा दिवसासाठी जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

विलगीकरणात असलेल्या ग्रामस्थांनी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या आवारात असलेल्या झाडांना पाणी देऊन उन्हाळ्यात झाडे जगवली.

तर स्वच्छता अभियानाने शाळेचा संपुर्ण परिसर स्वच्छ केला. रुग्णांना उपचार देणारे आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर व डॉ. विजय जाधव

यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह आलेल्या ग्रामस्थांनी घरी न थांबता विलगीकरण कक्षात तातडीने भरती होऊन प्रकृती गंभीर होण्याअगोदर उपचार करुन घेण्याचे आवाहन पै.नाना डोंगरे यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe