नवीन नियमावली ! आजपासून ‘ही’ दुकाने खुली होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध महापालिकेने १ जूनपर्यंत वाढविले आहेत.

महापालिकेने लागू केलेले कठोर निर्बंध शिथिल केले असून, शनिवारपासून शहरातील भाजीपाला विक्री, किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. याशिवाय कृषी सेवा केंद्रांची वाहतूक करण्यास सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

नगर शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कठोर निर्बंध लगू केले होते. त्याची मुदत शनिवारी सकाळी ७ वाजता संपणार असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी शुक्रवारी नव्याने आदेश जारी केला. यामध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

हे निर्बंध येत्या २५ मेपर्यंत लागू राहणार असून, खाजगी आस्थापना वगळता इतर अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नगर शहरातील भाजीपाला, किराणा विक्रीस पूर्णपणे बंदी हाेती.

पंधरा दिवसांनंतर भाजीपाला व किराणा दुकाने शनिवारपासून सुरू होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान नियमांचे उल्लघंन केल्यास प्रथम पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. दुस-या वेळेस पुन्हा पाच हजार रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe