अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पार चांगलाच चढलेला होता. मात्र शुक्रवार पासून तापमानात काहीसा चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले.
शुक्रवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिले आहेत.
नगर जिल्ह्याकरिता पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज विद्यापीठाने वर्तविला आहे. हवामान अंदाजात विद्यापीठाने म्हटले, पुढील पाच दिवस आकाश काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
दि. 15 ते 16 मे रोजी जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका तर दि. 17 ते 18 मे रोजी जोराचे वारे व विजेच्या कडकडाटांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम