वृत्तसंस्था :- बीएसएनएल आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर लाँच केलाय.हा प्लान 10 नोव्हेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
या नव्या प्लानची किंमत 997 रुपये आहे. या प्लानसोबत मोफत दोन महिन्यांसाठी आपल्या आवडीची रिंगटोनही लावण्याची सुविधा दिली जात आहे.
कंपनीने दिलेल्या या नव्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा दिली आहे. प्लानची वैधता 180 दिवसांची दिली आहे.
बीएसएनएलच्या या नव्या प्लानमुळे एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि जिओ कंपन्यांना मोठी टक्कर मिळणार आहे.
बीएसएनएलच्या प्लानची स्पर्धा भारतीय एअरटेलच्या 998 रुपयाचा प्लान, वोडाफोन, आयिडया आणि जिओचा 999 रुपयाचा प्लानसोबत होणार आहे.
या तिन्ही कंपनीच्या प्लानची वैधता कमीत कमी 90 दिवसांची आहे. एअरटेलच्या 998 रुपयांच्या प्लानची वैधता 336 दिवसांची आहे.
यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 12 जीबीचा डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळते. तसेच वोडाफोनच्या प्लानची वैधताही 365 दिवसांची आहे.
जिओच्या 999 रुपयांच्या प्लानची वैधता 90 दिवसांची आहे. ज्यामध्ये 60 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते.