अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-मुळानगर येथील वीज पुरवठा सोमवारी दुपारपासून बंद झाल्याने धरणातून पाणी उपसा झाला नाही. यामुळे पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.
धरणातून पाणी उपसा झाला नसल्याने परिणामी साठवण टाक्या भरल्या नाहीत. त्यामुळे नगरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
काही मिनिटे लाईट गेली तरी मुळानगर,विळद आणि नागापूर येथील पंपिंग स्टेशन पूर्वपदावर येण्यास दोन-तीन तासाचा अवधी लागतो.
सायंकाळी उशिरापर्यंत मुळानगर येथील वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार वारे वाहू लागले आहे.
यामुळे अनेक ठिकाणी विजेचे पोल उन्मळून पडले आहे. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका नगर जिल्ह्याला देखील बसला असल्याचे चित्र आता दिसून येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम