अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल तसेच पाऊसही चांगला असेल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. त्यानंतर आता हवामान विभागाने मान्सूनबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार होईल,

असा अंदाज देखील हवामान विभागनं वर्तवला आहे. देशात यंदा मान्सून 1 जून रोजी केरळ राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान अंदाज आणि कृषी रिस्क सोल्यूशन क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी असणाऱ्या स्कायमेटने 2021 मधील मान्सूनचा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता.
सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल.
तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
तसेच जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात देशात सरासरी 103 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम