आयपीएलचा थरार पुन्हा… या देशात खेळवले जाणार सामने

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- देशभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आयपीएलमध्येही शिरकाव केला. तसेच अनेक संघातील खेळाडू तसेच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

त्यानंतर आयपीएलच्या 14व्या पर्वाला स्थगिती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. पण आता हे सामने परत एकदा होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

बीसीसीआयला काहीही करून 14 वे पर्व संपवायचे आहे. कारण 14व्या पर्वातील उर्वरित 31 सामने झाले नाही तर बीसीसीआयला तब्बल 3 हजार कोटींचे नुकसान होणार आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच याची 29 मे रोजी बीसीसीआय घोषणा करू शकतं,

असं एका रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सामने थांबवून उर्वरित 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

परंतु, यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. पण आता आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केले जाण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe