अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यातील एका नामांकित अध्यात्मिक व शिक्षण संस्थेचे कार्य महाराष्ट्रात प्रसिध्द असल्याने पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार व्हावे; म्हणून त्या संस्थेत शिक्षणासाठी पाठवतात.
परंतु त्याच शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापकाने शैक्षणिक ग्रुपवर अश्लील चित्रफीत टाकल्याची धक्कादायक घटना घडल्याने ग्रुपमधील शिक्षक व महिला शिक्षकांनी व्यवस्थापकांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन संताप व्यक्त केला आहेत.
या प्रकरणाबाबत बाहेर कोणी चर्चा केली तर नोकरी गमवावी लागेल अशी धमकी देखील शिक्षण संस्था चालकांनी दिली असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियामुळे काही गोष्टी चांगल्या होतात तर काहींचे नुकसान होत आहेत.
सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठीच करा असे आवाहन देखील अनेकदा प्रशासनाने करुनही दुर्लक्ष होत असल्याचेच समोर येत आहे. व्यवसाय, व्यवसायची माहिती कर्मचारी असो किंवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाच्या ग्रुपवर टाकली की अवघ्या काही क्षणात माहिती प्रत्येकाला मिळत असल्याने काम करणे सोपे जाते.
यानुसारच कोपरगाव येथील एका शैक्षणिक संस्थेने आपले शैक्षणिक नियोजनासाठी ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये प्राचार्य, शिक्षक, शैक्षणिक संस्थेचे प्रमुख देखील आहेत. मात्र, याच संस्थेच्या व्यवस्थापकाने शैक्षणिक माहिती ऐवजी चक्क अनेक प्रकारच्या अश्लील चित्रफीत टाकून अनेकांना लज्जा होईल असे वर्तन केले आहे.
महिलेचा सन्मान व समाजात आदर्श व्यक्ती बनवायचे काम शिक्षक करत असतात आणि त्याच शिक्षण संस्थेमध्ये मुख्य अधिकार्यांकडून असा प्रकार होणे म्हणजे कुठेतरी असुरक्षिततेचे सावट समाजात जाणवत आहे.
तालुक्यातील नावाजलेल्या शिक्षण व धार्मिक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून अशी चूक होणे कुणालाच अपेक्षित नसताना देखील असा प्रकार समोर येणे म्हणजे समाजातील महिलेच्या सन्मानाला काळिमा फासणारे कृत्य आहे.
यावरुन अधिकार्यांवर धाक नसल्याचे निष्पन्न होत आहे.गुन्हा करून देखील आपल्या अधिकाराचा वाईट उपयोग करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणार्या अधिकार्यावर गुन्हा दाखल होईल का? शैक्षणिक संस्थेत काम करणार्या सर्वांना नियम सारखेच असतात.
परंतु तो व्यवस्थापक काहींच्या मर्जीतील असल्याने ‘तेरी भी चूप मेरी’ अशा वाक्याप्रमाणे झाले आहेत.सदरच्या व्यक्तीवर कारवाई करण्यापेक्षा त्या प्रकरणावर पांघरुन कशा पध्दतीने घालता येईल असे नियोजन शैक्षणिक संस्थेच्या चालकांकडून होत आहेत. सदर व्यक्तीवर कारवाई न झाल्यास अनेकांच्या विश्वासाला तडा जाणार आहेत.
कारण यापूर्वी देखील संस्थेच्या प्रमुखांची शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी चक्क पोलिसांच्या फोटोचा वापर करुन आपली दहशत किती हे दाखवून दिल्यामुळे व्यवस्थापकाची कारवाई म्हणजे नावापुरतीच आहे.
त्यामुळे आताही व्यवस्थापकावर कारवाई होणार का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र, या धक्कादायक घटनेने तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम