कोइम्बतूर : तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे रेल्वे रुळावर बसून दारू पिण्याऱ्या इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला आहे. या चौघांचाही घटनास्थळी मृत्यू झालेला आहे, तर त्यांचा सहकारी असणाऱ्या एका विद्याथ्र्याला किरकोळ मार लागला.
ही घटना बुधवारी रात्री उशिराने रावुथुर पिरिवू भागात घडली आहे. कोडईकनाल येथील सिद्दीक राजा आणि डिंडीगुल येथील के. राजशेखर हे दोन विद्यार्थी सुलूर येथील एका खाजगी इजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. विरूदनगर येथील करुप्पास्वामी आणि गौतम नामक दोन मित्र परीक्षा देण्यासाठी बुधवारी त्यांच्याकडे आले होते. मित्र आलेले आहेत.
एन्जॉय पार्टी करण्याच्या उद्देशाने ते चौघे व विघ्नेश नामक आणखी एक मित्र असे एकूण पाच जण रात्री १०.३० वाजेच्या सुमारास रेल्वेच्या रुळावर दारू पीत बसलेले होते. जास्त वेळ दारू पीत बसल्याने त्यांना दारू खूप चढली होती. यावेळी अचानक अलप्पे-चेन्नई एक्स्प्रेस गाडी आली.
गाडी इतकी वेगात होती की, ते उठण्यापूर्वीच त्यांचे तुकडे-तुकडे झाले होते; परंतु यातील एक जण उठून बाजूला जाण्यात यशस्वी ठरला, त्याचा जीव वाचला असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना रेल्वेचालकाच्या लक्षात आली तेव्हा वेळ टळून गेली होती. चौघांचे मृतदेह छिन्नविछिन्न पडले होते. याची माहिती रेल्वेचालकाने रेल्वे पोलिसांना दिली आहे.