भत्ता मिळवण्यासाठी रिक्षाचालकांना येतायत ऑनलाईन अडचणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली. मदतीच्या अपेक्षेने रिक्षाचालकांची देखील धावपळ सुरु झाली आहे.

मात्र ऑनलाईन अर्ज करण्यास रिक्षा चालकांना अडचणी येत असल्याने अनेक रिक्षा चालक आर्थिक मदतीपासून वंचीत आहे.

नगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या तीन हजार 520 रिक्षाचालकांपैकी आतापर्यंत एक हजार रिक्षा चालकांनी अर्ज केले.

त्यातील 70 रिक्षा चालकांनी अचूक माहिती भरल्याने त्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे साडेतीनशे रिक्षा चालकांनी माहिती अपूर्ण भरल्याने त्यांना अर्ज करण्यास पुन्हा संधी देण्यात आली आहे.

आजही अनेक रिक्षा चालकांनी अर्ज केला नसल्याने त्यांना मदत मिळालेली नाही. ऑनलाईनच्या किचकट प्रणालीमुळे ते मदतीपासून वंचीत राहण्याची शक्यता आहे.

अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नगर शहरासह नगर तालुका, शेवगाव, कर्जत, जामखेड, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यातील तीन हजार 520 रिक्षाचालकांची नोंद आहे. नोंदणी असलेल्या रिक्षा चालकांना अर्ज करण्याचे आवाहन परिवहन कार्यालयाने केले आहे.

शासनाने तुटपुंजी मदत दिली, त्यात अनेक अटी घातल्या गेल्याने रिक्षा चालकांमध्ये नाराजीचा सुरू आहे. मदत जाहीर होऊन देखील ऑनलाईन प्रणालीमुळे ते मदतीपासून वंचीत राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe