अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोर्टात पूर्वीसारखे सर्वांच्या उपस्थितीत सुनावणी होऊ शकेल. ऑगस्टपर्यंत शरिरीक उपस्थितीत सुनावणी सुरू व्हावी, यासाठी देवाला प्रार्थना करूया.
सर्वांना लस मिळावी, अशी प्रार्थना करूया. यामुळे आपल्याला सर्वांच्या उपस्थितीत सुनावणी करता येईल, असं न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले.
देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने लसीकरणावर भर दिला जात आहे. सर्वांना लवकर लस मिळेल आणि कोर्टाचे कामकाज पूर्वी प्रमाणे सुनावणी करता येऊ शकेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.
एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील एका पीठाने सुनावणी दरम्यान वरील टिपणी केली.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणाले, ‘सर्वांना लस मिळू दे, देवाकडे प्रार्थना करूया’ सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील पीठाने मंगळवारी सुनावणी केली. कोरोनावरील लस सर्वांना मिळाली पाहिजे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम