अखेर त्या बाजार समितीत कांदा मार्केट सुरू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोपरगाव बाजार समितीचे कांदा मार्केट बुधवारी सुरू झाले आहे. त्याबद्दल माजी सभापती सुनील देवकर यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले. लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांचेही सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले होते.

पावसाळा तोंडावर आला असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी, तसेच शेतीची मशागत करण्यासाठी आपल्याकडे असलेला कांदा व इतर शेतीमाल विकावा लागणार आहे. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन पुढाकार घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे बाजार समित्यांना लॉकडाऊनमधून वगळावे, अशी मागणी करत पाठपुरावा केला. जिल्हाधिकााऱ्यांनी तशी परवानगी दिली आहे.

बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन शेतकऱ्यांनी कोल्हे, जिल्हाधिकारी, तहसीलदार व बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले आहेत.

याप्रसंगी प्रगतशिल शेतकरी सुनील देवकर, माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ, नाटेगावचे सरपंच विकास मोरे, अशोक देवकर, कैलास सोमासे, बापू देवकर, अनुराग येवले,

शरद सांगळे, दादा दहे, कैलास धट, बाबा दहे, राजेंद्र चांडे, जालू शिंदे, अजय भिंगारे, विनोद परदेशी, मनोज तुपे, बाबासाहेब पानगव्हाणे, रणजित महाले आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe