अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २१ वर्षीय विवाहितेचा फर्निचर दुकानासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत,
म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना अटक केली.
विवाहिता पूजा सागर मापारी हिचे वडील विजय बाळकृष्ण भुजाडे (गोधेगाव) यांनी तक्रार दिल्यानंतर सागर भिमराज मापारी, भिमराज मापारी, संगीता मापारी व विशाल मापारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यावर पूजाला त्रास देणे सुरु झाले. तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम