जिल्ह्यातील या तालुक्यात वीज पडून एकजण ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- विहिरीचे काम करत असेल्या तरुणावर वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात लक्ष्मणवाडी या ठिकाणी घडली आहे.

या दुर्घटनेत संतोष जाधव हा तरुण जागीच ठार झाला आहे. तर त्याचा अन्य सहकारी सागर जाधव हा जखमी झाला असल्याची माहिती मिळते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यात झालेल्या पावसासोबत वीजाही पडल्या असून त्यात विहिरीचे काम करत असलेला

दहीगाव बोलका येथील रहिवासी असलेला तरुण संवत्सर शिवारात अजय भाकरे या शेतकऱ्याच्या विहिरीचे काम करत असतांना त्या ठिकाणी कडकडाट करत वीज पडली.

त्या वेळी हे तरुण विहिरीतून बाहेर येऊन त्यांनी लिंबाच्या झाडाचा आश्रय घेतला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

त्यात हा तरुण जागीच ठार झाला आहे. तर त्याचा सहकारी सागर जाधव हा जखमी झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe