अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- सतत कोसळणारा पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे मोठ्या लाटा उसळत होत्या. नंतर याची तमा न बाळगता ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डोंबिवलीजवळील देसाई खाडीतील एका हातभट्टीवर धडक कारवाई केली.
छोट्या रबरी बोटच्या साह्याने काही अंतरापर्यंत समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर पुढे पोहत जाऊन समुद्रकिनार्यापासून बऱ्याच अंतरावर तिवरांच्या झाडांमध्ये असलेली मोठी हातभट्टी उद्ध्वस्त केली.
या कारवाईत तब्बल ९२ हजार ८०० लिटर मद्य बनवायला लागणारे रसायन, ४४६ प्लास्टिक ड्रम आणि लोखंडी टोप असा दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
ही कारवाई आतापर्यंतची हातभट्टीवरील सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई मानली जात आहे. पावसाळ्यात अशा प्रकारच्या हातभट्यांची उभारणी जोरात केली जाते.
तिवरांच्या झाडांचा आणि पडणार्या पावसाचा फायदा घेऊन समुद्राला भरती असते तेव्हा अशा प्रकारच्या हातभट्ट्या जोरात चालतात.
मोठ्या प्रमाणात हातभट्टीची गावठी दारू बनवली जाते. त्यामुळे या काळात उत्पादन शुल्क विभागाची विशेष करून समुद्रकिनाऱ्यांवर आणि खाड्यांलगत असलेल्या तिवरांच्या झाडांवर नजर असते. अशा प्रकारची दारू बनवण्यास कोणताही परवाना नसून अशा प्रकारची दारू आरोग्यास हानीकारक आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम