अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-बहुप्रतीक्षेत असलेला नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी जमिनीच्या मोजणीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. पुणे ते नाशिक हा २३५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग असणार आहे.
पुणे नगर व नाशिक या तीन जिल्ह्यातून हा मार्ग जात असून हा प्रकल्प तब्बल साडे सोळा हजार कोटीचा आहे. दरम्यान या बहुप्रतीक्षित असलेल्या रेल्वे मार्गासाठी तब्बल ४ हजार ७६२ शेतकऱ्यांची ४४७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.
संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा, एलखोपवाडी, नांदूर खंदरमाळ, खंदरमाळवाडी, जाम्बूत, साकुर, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपरणे,
जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, समनापूर, अकलापूर, अंभोरे, पोखरी हवेली, पारेगाव खुर्द, नानज दुमाला, पिंपळे, निमोण, सोनेवाडी या गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. या २४ गावांपैकी पोखरी हवेली या गावातून सर्वाधिक जमिनीचे संपादन होणार आहे.
या २४ गावांतील ५८१ शेतकऱ्यांची ३४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. भूसंपादन करताना थेट खरेदी होणार आहे. ज्या भागातून रेल्वे जाणार आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना नोटीसा देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम