अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- तोफखाना पोलिसांनी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे प्रगटीकरण शाखेची (डिबी) स्थापना केली आहे. कायमच वादग्रस्त ठरलेली डिबी पुन्हा स्थापन झाल्याने आता त्यांच्या समोर गुन्ह्यांची उकल करून आरोपी जेरबंद करण्याचे आव्हान आहे.
पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना जेरबंद करण्यासाठी डिबी कार्यरत असते. मात्र तोफखाना पोलीस ठाण्याची डिबी अलीकडच्या काळात दोन वेळा बरखास्त करण्याची वेळ वरिष्ठांवर आली होती.
मात्र आता वरिष्ठांनी डिबी स्थापन करून तात्काळ गुन्ह्यांची उकल करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना संबंधीत अधिकारी, कर्मचार्यांना दिल्या आहेत.
दरम्यान डिबीच्या कारभाराची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या डिबीत सात कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये पोलीस हवालदार शकिल सय्यद, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, पोलीस शिपाई शैलेश गोमसाळे, सचिन जगताप,
अनिकेत आंधळे यांचा समावेश आहे. सध्या तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनलॉकनंतर अनेकांनी आपले धंदे पुन्हा सुरू केले आहे. अवैध धंदे बंद करण्यासाठी छापेमारी करण्याच्या सूचना नवीन डिबीला देण्यात आल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम