अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली. यातच ठिकठिकाणी लसीकरण केंद्र देखील सुरु केली.
यामाध्यमातून लसीकरणाचा टक्का वाढण्यास देखील मदत झाली. व त्याचबरोबर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देखील याचा फार मोठा हातभार लाभला आहे. दरम्यान शहरातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या केंद्रांमध्ये केडगाव अग्रस्थानी राहिले आहे.
यामध्ये प्रामुख्याने पहिले असता महापालिकेने लसीकरणासाठी आठ केंद्र सुरू केले असून, केडगाव उपनगरात सर्वाधिक १२ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सर्वात कमी लसीकरण मुकुंदनगरमध्ये झाले आहे.
शहरात लसीकरणावरून आरोप- प्रत्यारोप झाले. परंतु, शहरातच कमी लसीकरण झाले असून, केडगाव उपनगरातील आरोग्य केंद्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. महापालिकेला जिल्हा परिषदेकडून लस उपलब्ध करून दिली जात आहे.
नगर शहराची लोकसंख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. आत्तापर्यंत शहरासह उपनगरातील ८७ हजार ९०९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ६० हजार ५०९ इतकी आहे. दुसरा डोस २७ हजार ४०० नागरिकांनी घेतला आहे.
महापालिकेने लसीकरण करताना ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले आहे. नागिरक स्वत:हून लस घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. महापालिकेच्या सातही आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
लसीकरण मोहिमेत सुरुवातीला प्रभागनिहाय केंद्र सुरू करण्यात केले गेले. परंतु, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. लस पळविण्याचे ही प्रकार घडले. लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सर्व उपकेंद्र बंद करण्याचा धाडशी निर्णय घेतला.
आयुक्तांच्या या निर्णयाला नगरसेवकांकडून विरोध झाला. परंतु, आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने नगरसेवकांचा विरोध मावळला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम