अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक हे मागील काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांच्या तपासामुळे चर्चेत आहेत.
तपासाच्या या ससेमिऱ्याला कंटाळून सरनाईक यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं. हे पत्र रविवारी समोर आलं आहे. त्यावरून बरीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
ही चर्चा सुरू असतानाच हीच ती वेळ महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे, असे ट्विट करून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. तेश राणे यांनी दोनच वाक्यात ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं ब्रीद असलेल्या ‘हीच ती वेळ’चाही उल्लेख केला आहे.
नितेश राणे यांनी दोनच वाक्यात ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं ब्रीद असलेल्या ‘हीच ती वेळ’चाही उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
राज्यातील विविध विषय निकाली काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक बैठक झाली. या बैठकीवरून बरेच तर्कविर्तक लावले जात आहे.
शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार असल्याचीही भाकितंही केली जात आहे. त्यातच आता प्रताप सरनाईक यांनी दिलेली युतीची हाक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या निवडणूक जाहीरनाम्याचं ब्रीद वाक्य असलेल्या
‘हीच ती वेळ’चा उल्लेख करत सत्तांतराचे दिलेले संकेत, यामुळे राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम