अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- पुण्यातील ‘सीरम’ चे सीईओ आदर पूनावाला भारतात परतले असून, ते लंडनला जाण्याअगोदर लसीसाठी
आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावरून बरंच राजकारण झालं. आता ते परतल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चिला जाणार आहे.
पूनावालांना वाय दर्जाची सुरक्षा:- पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले. जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात असणाऱ्या पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता ते पुण्यात परतले असून हे प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पन्नास कोटी डोस पुरवणार:- सीरम फक्त भारतच नाही तर जगभरातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती कंपन्यांमध्ये गणली जाते. सीरम कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन करत असून आतापर्यंत सर्वाधिक वापर झालेल्या लसींमध्ये तिचा समावेश आहे. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सीरम केंद्र सरकारला जवळपास ५० कोटी लसींचे डोस पुरवणार आहे.
अदर पूनावाला यांचे आरोप:- पूनावाला यांनी आपल्याला मुख्यमंत्री ते उद्योजक अशा अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा केल्याने देशात सध्या खळबळ माजली होती. “कोविशिल्ड लशीसाठी आपल्याला देशातील काही बड्या व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे,” असं पूनावाला यांनी म्हटलं होतं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम