विश्वस्त मंडळाचा वाद न्यायालयात जाणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- उच्च न्यायालयाने घालून दिलेली नियमावली बाजूला सारून सरकार नैतिकतेच्या व्याख्येत न बसणा-यांची वर्णी साई संस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याचे घाटत आहे;

परंतु ज्यासाठी आतापर्यंत लढा दिला, ते सामाजिक कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. एकदा यादी जाहीर झाली, की त्याला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे.

शिवसेनेतूनही नाराजी :- साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाची घोषणा अद्याप सरकारने केलेली नाही; मात्र विश्वस्त मंडळात मद्यनिर्मिती करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कारखानदार, विविध प्रकारचे आरोप असणाऱ्या व्यक्तींची नावे समोर आल्याने टीका सुरू झाली आहे.

शिवसेनेतही संभाव्य विश्वस्त मंडळाबाबत नाराजी असून सेनेचे काही नेते मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडणार आहेत.

संभाव्य यादीवर गंभीर आक्षेप :- साई संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे धोरण ठरल्यानंतर संभाव्य विश्वस्त मंडळाची यादी सोशल मीडियात फिरत आहे.

कोपरगावात तर काही नेत्यांच्या समर्थकांनी जल्लोषही केला; मात्र जी नावे समोर आली त्यावर गंभीर आक्षेप जनतेतून नोंदविण्यात आले आहेत.

संस्थानच्या शुद्धीकरणाबाबत न्यायालयीन लढाई लढत असलेले संजय काळे यांनी याबाबत पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे.

गुन्हे दाखल झालेलेही यादीत?:-  संस्थानच्या विश्वस्त मंडळात कोणत्या व्यक्ती असाव्यात याबाबत न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी नियमावली घालून दिली आहे; मात्र शासन ही नियमावली व नैतिकता न पाळता दारू निर्मिती करणारे नेते, यापूर्वी अपात्र ठरलेले,

न्यायालयाने जामीन नाकारलेले, संस्थानला मालमत्ता विकणारे आदींना विश्वस्त करणार असेल तर तो भाविकांचा अवमान आहे, असे काळे यांनी म्हटले आहे.

विश्वस्त मंडळाच्या संभाव्य यादीत शिर्डीतील एकाही स्थानिक शिवसैनिकाचे नाव दिसत नसल्याने सेनेतही नाराजी आहे. यासंदर्भात शिर्डीत शिवसैनिकांची ज्येष्ठ नेते कमलाकर कोते यांच्या कार्यालयात बैठक झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!