अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- आता टी 20 वर्ल्ड कपचे सामने देखील भारताबाहेरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता टी 20 वर्ल्डकपही भारताबाहेर होणार आहे. या सामन्यांची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून UAEमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 16 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल असं सांगितलं जात आहे.
पहिल्या टप्प्यात 8 टीममध्ये 12 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 4 (प्रत्येक ग्रूपमधून 2) असे सामने खेळवल्यानंतर सुपर 12 साठी टीम क्वालिफाइड केल्या जाणार आहेत. या टीम बांग्लादेश, श्रीलंका, आयरलँड,
नीदरलँड, स्कॉटलँड, नामीबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी या टीम रँकिंग 8 टीम विरुद्ध सामने खेळून सुपर 12 पर्यंत पोहोचणार आहेत. सुपर 12 मध्ये एकूण 30 सामने खेळवले जाणार आहेत. 23 ऑक्टोबरपासून हे सामने सुरू होतील.
यामध्ये 6-6 अशी दोन ग्रूपमध्ये विभागणी असेल. हे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह इथे खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 3 नॉकआउट सामने होणार आहेत.
दोन सेमीफायनल आणि एक फायनल असा संपूर्ण शेड्युल असणार आहे. पहिल्यांदी टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.
याशिवाय भारतात डेल्टा प्लस आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठा लक्षात घेऊन टी 20 वर्ल्ड कपचे सामने UAEमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम