५० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात युवासेनेच्या एकास अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मयत झालेल्या जमीन मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदारांची ५० लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक केली आहे.

ऋषभ भंडारी (रा. स्टेशन रोड, नगर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी महेश संचेती (रा. विनायकनगर) यांनी १६ जानेवारीला कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली आहे.

दरम्यान याप्रकरणातील आरोपी भंडारी याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जून २०१९ मध्ये नगर तालुक्यातील वाळुंज येथील जागेचा व्यवहार महेश संचेती व ऋषभ भंडारी यांच्यात ठरून त्यापोटी संचेती यांनी ५० लाख रुपयांचे साठेखत केले होते.

मात्र काही दिवसांतच सदर जमिनीचे मूळ मालक हे २०१८ सालीच मयात झाले असून त्यांच्या जागी ऋषभ भंडारी याने तोतया जागामालक उभे करून बनावट साठेखत केल्याचे समोर आले होते.

संचेती यांनी भंडारी याच्याकडे साठेखताचे ५० लाख रुपये परत मागितले तेव्हा भंडारी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

त्यानंतर संचेती यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, भंडारी याचा जिल्हा न्यायालय व खंडपीठातही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe